अर्थ : एखाद्याच्या अंतर्गत असणे.
उदाहरणे :
बनारस हा प्रांत उत्तरप्रदेशात येतो.
अर्थ : चर्चेनंतर वा विवेचनानंतर एखाद्या निष्कर्षापर्यंत पोहोचणे.
उदाहरणे :
त्या निष्कर्षापर्यंत येण्याइतपत तपशील त्यांना मिळाला नाही.
समानार्थी : पोहोचणे
अर्थ : पुरळ, साथ इत्यादी दिसावयास लागणे वा बाहेर पडणे वा उद्भवणे.
उदाहरणे :
त्याच्या अंगावर घामोळे उठले आहे.
समानार्थी : उठणे
अर्थ : एखाद्या विशिष्ट कालावधीची सुरूवात होणे वा आगमन होणे.
उदाहरणे :
वसंत ऋतू आला.
समानार्थी : आगमन होणे, आरंभ होणे, प्रारंभ होणे, सुरूवात होणे
अर्थ : हस्तक्षेप करणे वा इतरांच्या कृतीत सहभागी होणे.
उदाहरणे :
आमच्यामध्ये तुम्ही पडू नका.
समानार्थी : पडणे, हस्तक्षेप करणे
अर्थ : पूर्वीपेक्षा जास्त उंच होईल वा दिसेल अशा अवस्थेला येणे.
उदाहरणे :
शाळेचा आधारस्तंभ कमरेपर्यंत आला आहे.
समानार्थी : उंचीचे होणे, होणे
अर्थ : एखादी वस्तू विकत घेतल्यानंतर आपल्या अधिकारात येणे.
उदाहरणे :
सोमवारी आमची नवीन गाडी येणार.
समानार्थी : मिळणे
अर्थ : पुरळ, घामोळी इत्यादी दिसायला लागणे (इत्यादींचा उद्भव होणे).
उदाहरणे :
उन्हाळ्यात अंगावर खूप घामोळ्या उठतात.
समानार्थी : उठणे
अर्थ : एखाद्या संदर्भात क्रिया करण्याची क्षमता असणे.
उदाहरणे :
मला शिवणकाम येते.
अर्थ : राग, लोभ इत्यादी मनोविकार उद्भवणे.
उदाहरणे :
त्याला राग आला.
अर्थ : घडण्यास सुरवात होणे.
उदाहरणे :
मला झोप येत आहे.